शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (13:40 IST)

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात रास्ता रोको

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सुरु आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज समर्थन देत आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी कोल्हापुरात शिवाजी पुलावर मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या वेळी आम्हाला आमचा हक्क द्या, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे आहे. जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलकानी केल्या. या वेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. 
 
संभाजी राजे छत्रपती यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन 27 फेब्रुवारी रोजी उपोषणाला बसण्याचे सांगितले होते. ते एकटे जरी या उपोषणाला बसले असले तरी त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजातूनच नव्हे तर बहुजन समाजातील लोकांकडून देखील त्यांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या बाबतची ठराव पत्रे सकाळ मराठा समाजाला पाठविण्यात आली आहे. 
 
राज्यातून या आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा बांधवाना पोलीस प्रशासनाने अटकाव लावू नये. असे ट्विट संभाजी राजे छत्रपती यांनी केले आहे.