1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Three people die after falling from Khavala Pahad in Sambhajinagar

मुलाला वाचवण्याचा प्रयत्नात आई-वडील खवल्या पहाडावरून पडले; भीषण दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील खवल्या पहाडावरून आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचे आई-वडीलही एका वरून खाली पडले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वीकडे फिरत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरला लागून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खवल्या पहाडात घडलेल्या भीषण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, जो कोणाचाही थरकाप उडवेल. कौटुंबिक वादातून, डोंगराच्या धोकादायक टोकावर पोहोचलेल्या एका तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी यांच्या म्हणण्यानुसार, ही संपूर्ण घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. कौटुंबिक वादामुळे तो तरुण खावल्या पहाडच्या सर्वात उंच आणि धोकादायक शिखरावर चढला होता.  माहिती मिळताच, छत्रपती संभाजीनगर पोलीस, अग्निशमन दल आणि त्या तरुणाचे कुटुंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जवळपास तीन तास, कुटुंब आणि बचाव पथकाने त्या तरुणाला समजावले, दरम्यान तरुणाचा अचानक तोल गेला आणि तो थेट खाली पडू लागला. आपल्या मुलाला पडताना पाहून, आई-वडिलांनी त्याला पकडण्यासाठी हात पुढे केले. या गोंधळात, त्यांचाही तोल गेला आणि तेही खाली पडले. अपघाताचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
घटनेनंतर तात्काळ, छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने खाणीत उतरून बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर, तिघांचे मृतदेह बाहेर काढूनरुग्णालयात पाठवण्यात आले.  
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
महाराष्ट्रात मोकळ्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी, उल्लंघन केल्यास १० लाख रुपयांचा दंड; तुकाराम मुंडे यांचे आदेश