1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (09:58 IST)

विरार मध्ये इमारतीची भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू

Three women laborers died
विरारमध्ये एका इमारतीचे बांधकाम चालू असणाऱ्या इमारतीची भिंत कोसळल्याने 3 महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीचे बांधकाम सुरु असताना ही घटना घडली आहे. या घटनेत 3 महिला मजुरांचा मृत्यू झाला. 

सदर घटना विरार पूर्वेच्या स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला सुरु असणाऱ्या इमारतीजवळ घडली आहे. फायलिंगपासून चौदा फूट उंच भिंतीच काम सुरु असताना दुपारी 3:30 च्या सुमारास भिंत कोसळली आणि तिथे काम करणारे पाच मजूर भिंतीच्या खाली दाबले गेले. या मध्ये तीन महिला मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला. 
 
शाहूंबाई अशोक सुळे, लक्ष्मीबाई बालाजी गावाने, राधाबाई एकनाथ नावघरे अशी मयत महिला कामगारांची नावे आहेत. तर नंदाबाई अशोक गव्हाणे आणि पुरुष मजूर जखमी झाले आहे. एकूण 12 मजूर या ठिकाणी काम करत होते. हे कामगार मराठवाडा नांदेड, परभणी येथील रहिवाशी असून वसई, नालासोपारा, विरार भागात मजूर म्हणून काम करत होते. 
 
Edited by - Priya Dixit