रविवार, 23 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 फेब्रुवारी 2025 (16:54 IST)

नागपुरात शेतात गुरे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू

tiger
नागपुर जिल्ह्यात पारसेवनी तालुक्यात कोंढासावली गावाजवळ शेतात गुरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला आणि शेतकऱ्याला 50 फूट ओढत नेले. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. 
नागपुरात वाघाने हल्ला केल्याची ही दूसरी घटना आहे. या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी त्याच्या शेताकडे जात असताना झुडपांच्या मागे लपलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला आणि त्याला मानेने धरुन फरफटत 50 फूट ओढत नेले. या मुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला.दशरथ धोटे असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. धोटे यांच्यावर वाघाने हल्ला केल्यावर त्यांनी आरडओरड केली.
त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाला ऐकून गावकरी जमा झाले आणि त्यांचा मुलगा आणि गावकरी मदतीला धावले.तो पर्यंत धोटे हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाचवता आले नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावकऱ्यांनी आवाज केल्यामुळे वाघ जंगलाकडे पळून गेला. या घटनेमुळे गावत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
Edited By - Priya Dixit