सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (10:36 IST)

बुलढाणा: वाघामुळे शाळा-महाविद्यालये बंद

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वस्तीमध्ये वाघ शिरला होता. वस्तीत वाघ शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी वाघाला पाहिले असून डरकाडी फोडत वाघ हा मार्गक्रमण करीत आहे अशी माहिती वन विभागाला देण्यात आली. अद्याप या वाघाला पकडण्यात यश आले नाहीये. पट्टेदार वाघ शहरात शिरल्याने भीतीने वातावरण आहे. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा शोध घेऊन खामगावकरांना वाघाच्या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी होताना दिसत आहे. वनविभाग वाघ पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी वाघ पकडल्याशिवाय खामगावातील शाळा सुरू होणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता परिसरातील शाळांकडून घेण्यात आली आहे.