मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (07:38 IST)

सोलापूर : डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

भोसरे ता.माढा येथील जगदाळे नगरमध्ये हल्ली रहिवासी असलेल्या रघुनाथ नामदेव कलम(वय-२२,मूळ रा पाचइमली, नेपानगर, जि बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश)याने डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने व तो फेडण्यास असमर्थ ठरत असल्याने राहत्या घरी रविवारी मध्यरात्री झोळीच्या सहाय्याने अँगलला लटकून आत्महत्या केली.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रघुनाथ कलम हा मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असून काही कामानिमित्त तो भोसरे येथे वास्तव्यास होता.काही दिवसांपासून तो आपल्या पत्नीला माझ्याकडे लोकांचे पैसे असून त्यामुळे कर्जाचे ओझे डोक्यावर झाले आहे असे सांगत होता.त्याने एक दोघाकडे कर्ज फेडण्यासाठी उसने पैसेही मागितले होते,परंतु ते मिळाले नसल्याने कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला. त्यामुळे रविवारी मध्यरात्री घरातील लहान बाळ उठल्यानंतर त्याला शांत करण्यासाठी पत्नी आरती ही बाहेर गेल्यानंतर मयत रघुनाथ याने बाळाच्या झोळीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताचे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत कुर्डुवाडी पोलीसांत मयताची पत्नी आरती कलम हिने खबर दिली असून पोलिसांत आकस्मिक निधन म्हणून दाखल केले आहे.