संबंधित माहिती
- Omicron : मुंबई, पुण्याच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार, 'हे' आहेत नियम
- साहित्य संमेलनासाठी नियमावली जाहीर, असे आहेत नियम
- मतमोजणी काळात एकच चर्चा, नगर अर्बनच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी ; चिठ्ठीतील लिहला असा काही मजकूर
- राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती; सीताराम कुंटेंची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती
- या शहरातील नगरसेवकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसच घेतली नाही..!
व्यापाऱ्याची तहसील कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या
भाऊसाहेब सर्जेराव घनवट (वय २९) असे युवकाचे नाव असून शेवगाव तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या लिबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. ३० रोजी उघड झाली. तो बाभुळगाव येथील रहिवासी आहे.
पोलिसांना याची खबर मिळताच त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविला व मृताच्या नातेवाईकाला खबर दिली.
दरम्यान, पहाटे गळफास घेतला असावा असा पोलिसांच्या अंदाज आहे. शेवगाव एस. टी. आगारात चालकाने फाशी घेतल्याची घटना ताजी असताना महिनाभरात तहसील कार्यालयासमोर व्यापार्याने फाशी घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.
