बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (16:00 IST)

एकाच झाडाला प्रेमी जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

भंडारामध्ये एका धक्कादायक घटनेत शेतात एकाच झाडाला तरुण प्रेमी जोडप्याने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. साकोली तालुक्यातील सुंदरी येथील शेतशिवारात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 
पोलिसांच्या चौकशीनंतर दोघे नम्रता ज्युनिअर कॉलेज साकोली येथील बारावीचे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
कोमल वाघ रा. परसोडी आणि कमलेश राऊत रा. सुंदरी असे मृत प्रेमी युगलाचे नाव आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळण्यात आलेले नाही.