शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (07:50 IST)

मुलाचा मृतदेह घेऊन जाण्याची वेळ; सटाणा येथील दुर्देवी घटना

ambulance
नाशिक जिल्ह्यातील सटाणा महामार्गावर रविवारी रात्री दुचाकीचा अपघात त्यात सागर श्रावण खैरनार या २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, अपघास्थळी धाव घेतल्या घेतलेल्या नागरिकांनी तातडीने १०८ या रुग्णवाहिकेला फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचली चालक श्रावण खैरनार हे गर्दीतून पुढे आले असता आपल्याच मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. अखेर दुसऱ्या चालकाच्या मदतीने आपल्याच मुलाचा मृतदेह त्यांना घेऊन जाण्याची दुर्देवी वेळ आली. सागर हा सटाणा शहरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये काम करीत होता. ड्युटी संपल्यावर वासोळ येथे घरी जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. तर त्याचे वडील श्रावण खैरनार हे देवळा शासकीय रुग्णालयात कार्यरत आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी आज पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.