शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सांगली , बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (00:41 IST)

कोयना एक्सप्रेस पहिल्यांदाच ‘इलेक्ट्रिक इंजिन’वर धावली

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या विकासाची नांदी म्हणून पाहिल्या जात असलेल्या पुणे मिरज-लोढा या विद्युतीकरण पुर्ण झालेल्या एकेरी मार्गावरून रविवारी पहिली गाडी सोडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी धावणारी कोयना एक्सप्रेस या गाडीला इलेक्ट्रिक इंजिन जोडून ही गाडी यशस्वी पणे कोल्हापूरकडे सोडण्यात आली. थेट मुंबईहून कोल्हापूर पर्यंत इलेक्ट्रिक इंजिन जोडल्याने गाडीचा वेग वाढला असल्याचे सांगण्यात आले.
 
दरम्यान कोयना पाठोपाठ कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी, व कोल्हापू- गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या आणखी दोन गाड्या इलेक्ट्रिक इंजिन द्वारे सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर मुंबई रेल्वेमार्गावर इलेक्ट्रिक गाड्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने रेल्वे प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत होता.