शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (15:57 IST)

रेल्वे प्रशासनाकडून 'या' गाड्या रद्द

मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनानं ८ आणि १० ऑगस्ट रोजी धावणारी बिदर-लातूर-पुणे-मुंबई सीएसटी एक्सप्रेस रद्द केली आहे. तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी धावणारी मुंबई सीएसटी-पुणे- लातूर-बिदर  एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय ९ आणि ११ रोजी धावणारी लातूर-पुणे- मुंबई सीएसटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. ८ आणि ११ ऑगस्ट रोजी धावणारी मुंबई सीएसटी-लातूर एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. 
 
याशिवाय मुंबई सीएसटी ते हैद्राबाद एक्सप्रेसही ९ ते १२ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर हैद्राबादहून मुंबई सीएसटी पर्यंत धावणारी रेल्वे ८ ते ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे.