1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (08:15 IST)

नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंची बदली; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

Nashik Police
नाशिक : नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच बदली:
अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिकचे पोलीस आयुक्तायलाची जबाबदारी 13 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आली होती. त्या आधीचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची नऊ महिन्यातच बदली करण्यात आली होती. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात ते अपयशी ठरत असल्याने त्यांची बदली करून त्या ठिकाणी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंकुश शिंदे यांनी या आधी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी पार पाडल्यान ते नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालतील अशी अपेक्षा होती.
 
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज प्रकरणी निर्बंध घालण्यात पोलिसांना आलेल्या अपयशानंतर आता अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच पुन्हा बदली करण्यात आली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor