अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची बदली
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता. त्यांमुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते.
त्यानंतर, या सर्व प्रकरणाची गृह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई केली होती. पोलीस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागाने काढले होते. मात्र, आता दोषी यांची जालना येथून बदली करण्यात आली आहे. तुषार दोषी यांची बदली पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आजच आंतरवाली सराटीतील लाठीमारचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते याची माहिती समोर आली होती. तर, दुसरीकडे आजच तुषार दोषी यांच्या देखील बदलीचे आदेश निघाले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी गावात उपोषणास बसले होते.
मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलेले. उपोषणात त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच दरम्यान आंदोलनाचे समर्थक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि अखेर त्याचे पर्यावसन लाठीचार्ज करण्यात झाला.
Edited By - Ratnadeep ranshoor