मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (08:16 IST)

मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

mantralaya
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी मंत्रालयात पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविधविभागाचे मंत्री आणि सचिव उपस्थित होते. ही बैठक आटोपताच राज्य सरकारने राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदली झालेले अधिकारी आणि त्यांचे नव्या नियुक्तीचे ठिकाण असे
 
०१. श्रीमती भाग्यश्री बाणाईत – मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.
०२. श्री व्ही एन सूर्यवंशी – अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.
०३. श्रीमती सौम्या शर्मा – सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.
 
०४. एस एम कुर्ती कोटी – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर नियुक्ती.
०५. श्री एस एस चव्हाण – आयुक्त कृषी या पदावर नियुक्ती..
०६. श्री तुकाराम मुंढे – आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली – नियुक्ती प्रतीक्षाधिन.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor