1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (08:34 IST)

मंत्रिमंडळ बैठकीनंतर या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी मंत्रालयात संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनंतर राज्यातील एकूण सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशानुसार, खालील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
 
१. श्रीमती शीतल उगले-तेली, IAS (MH:2009) – संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांची सोलापूर महानगरपालिका, सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. श्री पी. शिवशंकर, IAS (MH:2011) महापालिका आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांची संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. श्री एस. राममामूर्ती, IAS (MH: 2013) यांची MMRDA, मुंबई सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. श्री योगेश कुंभेजकर, IAS (MH:2016) सीईओ, जिल्हा परिषद, नागपूर यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. श्री भाग्यश्री विसपुते, IAS (MH:2017) सीईओ, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची सीईओ, जिल्हा परिषद, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. श्री एस.एम.कुर्तकोटी, IAS (MH:9999) यांची सीईओ, जिल्हा परिषद, बुलढाणा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor