गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (09:25 IST)

झाडांच्या फांद्या छाटणीचे काम : तर महानगगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही

5 tallest trees
मुंबई : मुंबई महानगरात सर्व्हेक्षण केल्यानंतर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणीचं उद्यान विभागाकडून सुरू आहे. मात्र ही छाटणी सुरू असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. यातून अनेकदा कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद झाल्याचे प्रसंग घडले आहेत. कामांमध्ये व्यत्यय देखील येतो आहे. 
 
वाहनांचे नुकसान होवू नये म्हणून महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधी कळवण्यात येतं. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि फांद्या छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले तर महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
मुंबईत झाडांची संख्या
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे 29 लाख 75 हजार झाडं आहेत. यापैकी 15 लाख 51 हजार 132  एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर 10 लाख 67 हजार 641 झाडं शासकीय इमारती तसंच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी 1 लाख 86 हजार 246 झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. 
 
यंदा मुंबई महानगरात एकूण 1 लाख 12 हजार 728 झाडांची छाटणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 12 एप्रिल 2024 अखेरपर्यंत 15 हजार 821 झाडांची छाटणी झाली आहे. 7 जून 2024 अखेरपर्यंत उर्वरित 96 हजार 907 झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागानं ठेवलं आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली 414 झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी 338 झाडे काढून टाकण्यात आली असल्याचं उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी सांगितलं. खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहनही जितेंद्र परदेशी यांनी केलं आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor