शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2024 (12:35 IST)

आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

voting
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपल्या पालकांनीही सहभाग नोंदवावा अशी चिमुकल्यांची अपेक्षा! हीच अपेक्षा वर्सोवा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आई-बाबांना पत्र लिहून व्यक्त केली. ‘आई – बाबा मतदान नक्की करायचं हं..’ अशी आवाहन करणारी पत्रेच या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना लिहिली.
 
मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांनी मताधिकार बजावावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तुमचे एक मत देशासाठी ठरणार बहुमत यासाठी स्वीपच्या माध्यमातून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून आज वर्सोवा येथील यूपीस या इंग्रजी माध्यम शाळेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
 
देशाच्या सर्वांगीण विकासात भावी पिढीचे योगदान अमूल्य असणार आहे. जर विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मतदानाचे महत्व पटवून दिले तर देशात एक सक्षम लोकशाही उभी राहण्यास नक्कीच मदत होणार आहे. ही बाब विचारात घेवून कामा रोड येथील इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रलेखनातून मतदान करण्यासाठी आग्रह केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी उंचावण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.
 
लोकशाहीची हाक ऐकू या मतदार यादीत नाव नोंदवू या
लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील युवक व युवतींचा सहभाग वाढावा यासाठी चर्चगेट, मरीन लाईन्स येथे स्वाक्षरी मोहीम आणि मतदान प्रतिज्ञा बँडचे वितरण असा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात 250 हून अधिक महिलांनी आणि युवतींनी सहभाग घेतला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून लोकल ट्रेन मधील प्रवासी महिलांना मतदानाचे महत्व पटवून देत संवाद साधण्यात आला.
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन पी-दक्षिण विभाग आणि 175- कलिना विधानसभा मतदारसंघातील एच/पुर्व विभागातील बचत गट, मारुती टेकडी कलिना, सांताक्रुझ (पुर्व), रईस वस्ती संघ, पी उत्तर आणि एल वॉर्ड कुर्ला येथे महिला बचत गटांच्या सदस्य यांनी यावेळी ‘….मी मतदान करणार’ अशी शपथ घेत मतदान करण्याचा संकल्प केला. आसपी नूतन शाळा, मारवे रोड, मालाड पश्चिम येथे 158 जोगेश्वरी पूर्व, एसआरपी रेसिडेन्सी, सिध्दी सहकारी संस्था, गौरी नगर गोराई, बोरीवली 177 वांद्रे (प.), सखी सहेली मेळावा, अंगणवाडी सेविका तसेच बचत गट, शताब्दी रुग्णालय गोवंडी येथे नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती आणि चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील लहान मोठी दुकाने, स्वच्छता कर्मचारी आणि घरोघरी जाऊन मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले.
 
आपले नावं मतदार यादीत आहे का
मतदान जनजागृती अभियानातून मतदारांना मतदानाचा हक्क बाजवता यावा यासाठी आपले नावं मतदार यादीत तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in/ voter Helpline Mobile App वर आणि मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा, असे आवाहन देखील जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.
 
Edited By- Ratnadeep ranshoor