बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 6 एप्रिल 2024 (12:32 IST)

श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले-

shrikant shinde
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा अद्याप महायुतीने केली नाही. त्यामुळे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळण्याबाबत प्रश्न निर्माण होत होते. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट म्हटले आहे. ते नागपुरात भाजपच्या वर्धापनदिन निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट म्हणाले. भाजपचा श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

ते कल्याण मतदारसंघातून शिवसेने आणि महायुतीचे उमेदवार असणार. जास्त मताने ते या मतदारसंघातून निवडून येतील. आता श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे जाहीर झाले आहे. आता या मतदार संघात ठाकरे गटातून वैशाली दरेकर आणि शिवसेने गटातून श्रीकांत शिंदे यांच्यात सामना होणार आहे. 
 
 Edited by - Priya Dixit