सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (20:52 IST)

चोरदरा घाट चढत असताना ५० फूट खाली पडून ट्रेकरचा मृत्यू

नाशिक : ट्रेकरचा माळशेज घाट परिसरात चोरदरा घाट चढत असताना ५० फूट खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, किरण काळे  (वय ५२) असे मृत्यू झालेल्या ट्रेकरचे नाव आहे. रविवार नाशिक येथील 'जिप्सी ट्रेकर्स'च्या १५ ट्रेकरचा ग्रुप माळशेज परिसरात जुना माळशेज घाट व चोरदरा घाटात ट्रेकिंगसाठी  आला होता. त्यावेळी दुपारच्या सुमारास चोरदरा घाट चढत असताना शेवटच्या चढाईदरम्यान लागणाऱ्या कठीण टप्प्यावरून जातांना अचानक किरण काळे यांचा तोल गेला. त्यामुळे ते थेट ५० फुट खोल असलेल्या दरीत कोसळल्याने त्यात काळे यांचा जागीच मृत्यू झाला.
 
.दरम्यान, यानंतर घटनास्थळी तात्काळ स्थानिक पोलिसांसह गिर्यारोहक आणि रेस्क्यू टीमने तातडीने दाखल होत इतर अडकून पडलेल्या ट्रेकर्सची यशस्वी सुटका केली. त्यानंतर नाशिकच्या दयानंद कोळी, मुरबाड येथील सह्यगिरी ट्रेकर्सचे दीपक विशे व खोपोली येथील गणेश गिध यांनी इतरांच्या मदतीने खोल दरीतून किरण काळे यांचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव नाशिकमध्ये आणण्यात आले. काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor