Marathi Biodata Maker

व्हॉट्सअ‍ॅपवर तिहेरी तलाक दिला

बुधवार, 8 मे 2019 (18:33 IST)
भिवंडीतील आरजू शेख (23) या महिलेस व्हॉट्सअ‍ॅपवर तिहेरी तलाक दिला आहे. पीडित महिलेने पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी आणि महिला हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे. कल्याणमध्ये टेक्निकल इंजिनीअर म्हणून काम करणार्‍या नदीमसोबत 18 मे 2014 रोजी मुस्लिम धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे आरजू शेखचा निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी नदीम यास 10,051 रुपये व संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या होत्या. लग्नानंतर मात्र लगेचच आरजूचा छळ सुरू झाला. तिला मारझोड करणे, शिवीगाळ करणे, तू पसंत नाही असे ऐकवत मारझोड करणारा नदीम तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तरीही आरजूने पाच वर्षे संसार टिकवून ठेवला. 
 
नदीम व आरजू यांना एक चार वर्षांचा मुलगा आहे. परंतु काही महिन्यांपासून नदीमने फ्लॅट घेण्यासाठी 10 लाखांची मागणी केली व ती पूर्ण न केल्याने पीडित महिलेला बेदम मारहाण करून तिला घरातून बाहेर काढले आणि व्हॉट्सअ‍ॅपवरच तिहेरी तलाक दिला.
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

World Environment Day 2026 Wishes in Marathi जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

LIVE: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर उमेदवार बाळ माने यांना पक्षातून काढून टाकले

भारताचे व्यापाराचे दरवाजे जगासाठी खुले आहे, मंत्री पीयूष गोयल म्हणाले- भारत जागतिक व्यावसायिक भागीदारीसाठी पूर्णपणे तयार आहे

श्रीलंकेतील वृद्धाश्रमात भीषण आग; ११ वृद्ध व्यक्तींचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

कोकण विधान परिषद निवडणुकीत गोंधळ उडाला; उद्धव ठाकरे यांनी बाळा माने यांना पक्षातून काढले?

पुढील लेख
Show comments