रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (11:53 IST)

ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाकडून घृणास्पद कृत्य, 8 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने खळबळ उडाली असतानाच, कल्याणमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे घरगुती ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने अवघ्या ८ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
पीडित बालिकेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणात नराधम शिक्षक मुदर तालवाला याला अटक केली.
 
कल्याणच्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी आठ वर्षीय पीडित याच भागातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जात होती. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली असल्याने शिक्षिकेचा पती शिक्षक मुदर तालवाला या मुलीची शिकवणी घेत होता. दरम्यान पीडित मुलगी शिकवणीला जायला तयार नव्हती. 
 
तिला शिकवणीला जाण्यास सांगितवर ती रडायला लागयची. यावरून मुलीच्या आईला संशय आला आणि त्यांनी चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर मुलीने घडलेला प्रकार हावभाव करुन दाखविला. नंतर आईच्या संपूर्ण प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दिली. 
 
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चौकशी सुरु केली आणि या प्रकरणी 42 वर्षीय शिक्षक मुदर तालवाला याला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर केले त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकाला कठोरतील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.