शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2017 (16:34 IST)

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप

उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे. तुळजाभवानीच्या अभिषेकावेळी विवेक पाटील नावाच्या पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप राजेंद्र विष्णू भोकरे यांनी केला आहे. राजेंद्र भोकरे यांनी या सगळ्या प्रकाराची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. तर  राजेंद्र भोकरेंच्या तक्रारीनंतर तुळजापूर पोलिसांतही गुन्हा दाखल झाला आहे. भोकरे हे मूळचे औरंगाबादचे आहेत.“रांगेत असताना मागच्या लोकांचा धक्का लागल्याने पुढे आलो आणि हातातील दही पडलं. त्यामुळे पुजाऱ्याने आधी थोबाडात मारली. नंतर मी माफी मागूनही पुजाऱ्याने मोठ्या आवाजात दम भरत मारझोड केली,” असा आरोप राजेंद्र भोकरे यांनी तक्रारीत केला आहे.