तुळजापूर मंदिर ट्रस्टने 12 पुजाऱ्यांवर कारवाई केली
महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध तुळजापूर मंदिरातील 12 पुजाऱ्यांवर शिस्तभंग, अनुचित वर्तन आणि नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तुळजापूर मंदिर ट्रस्टने ही कारवाई केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, बारा पुजाऱ्यांना 15 दिवसांपासून ते सहा महिन्यांपर्यंत तुळजा भवानी मंदिर परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
देऊळ ए कवायत कायद्यानुसार मंदिरातील 12 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात निजामाच्या काळापासून देऊळ ए कवायत कायद्यानुसर कारवाई करण्यात येते.
काही महिन्यांपूर्वी माजी खासदार संभाजीराजराजे छत्रपती यांना देखील मंदिरातील पुजाऱ्यांनी या कायद्यानुसार मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले होते. आता याच कायद्यानुसार 12 पुजाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
मंदिराच्या कायदा-सुव्यवस्थेत अडचण निर्माण करणे, गैरवर्तन, शिस्तभंग या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit