शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (22:41 IST)

पंढरपूरहून पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येताना अपघातात दोन भावांचा मृत्यू

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पंढरपूरहून पांडुरंगाचं दर्शन करून येताना दोघा भावांचा मृत्यू झाला आहे. दयानंद बेल्लाळे आणि सचिन बेल्लाळे असे हे मृत्युमुखी झालेल्याची नावे आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील सारोळी पाटी नजीक घडली आहे. या अपघातात बल्लाळे त्यांची पत्नी आणि भावजय हे गंभीर जखमी झाले आहेत. 
 
रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला त्यांची कार जाऊन धडकली या अपघाता मध्ये कारचा चुरडा झाला असून चालकासह बाजूला बसलेले बेल्लाळे जागीच ठार झाले. यांचा मृतदेह कार मध्ये अडकला होता. यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. 
 
बेल्लाळे कुटुंब पंढरपूरहुन विठ्ठलाचे दर्शन करून परत येत होते. दयानंद बेल्लाळे त्यांची पत्नी, त्यांचे भाऊ सचिन बेल्लाळे आणि त्यांच्या पत्नी या कार मध्ये होते. कार चालक चालवत होता. या अपघातात दयानंद बेल्लाळे त्यांचे भाऊ सचिन बेल्लाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दयानंद यांची पत्नी आणि भावजय हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे बेल्लाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दयानंद बेल्लाळे हे सोलापूर पोलीस दलात कर्मचारी होते.