1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (11:05 IST)

बीडमध्ये दोन भाऊ मशिदीत जात असताना गटातील लोकांकडून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला

Maharashtra News
महाराष्ट्रातील बीड मध्ये 2 भावांवर मशिदीत हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. यामध्ये दोघी भाऊ गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 ते 8 लोकांच्या समूहाने यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हे प्रकरण बीड शहरात असलेले बुंदेलपुरा मशिदीतील आहे.  
 
तसेच माहिती मिळाली की, तीन महिन्यांपूर्वी पेठबीड परिसरात देखील जमील कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या भावाने मेहबूब खान यांच्यावर हल्ला केला होता. जमील कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या भावाविरुद्ध पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
 
तसेच पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि बीड शहर पोलीस घटनास्थळी पोहचली आणि पोलिसांची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी हल्ल्यात वापरण्यात आलेले धारदार हत्यार, वीट आणि कुर्हाड जप्त केली आहे. तसेच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.