गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (10:19 IST)

नागपूर : कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगार ठार, सात जखमी

fire
नागपूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सीमेंटच्या का कारखान्यमध्ये बॉयलर फुटल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात इतर कामगार जखमी झाले आहे. एका पोलीस अधिकारींनी ही माहिती दिली आहे. 
 
ही घटना नागपुर पासून 50 किलोमीटर दूर मौदा तालुक्यातील जुल्लर गावामध्ये स्थित श्रीजी ब्लॉक्स प्राइवेट लिमिटेड कंपनीमध्ये सकाळी घडली आहे. मौदा पोलीस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, क्रेन चालक आणि जुल्लर निवासी नंदकिशोर रामकृष्ण वय 40  यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राणा मंगली गावातील  ब्रह्मानंद मानेगुर्डे वय 45 यांचा नागपूरमधील एका रुग्णालयात मृत्यू झाला. 
 
पोलिसांनी सांगितले की इतर सात कामगार गंभीर रूपाने जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच कारखान्याजवळ असलेले सहा घरे क्षतिग्रस्त झाले आहे. तसेच या घटनेमध्ये तीन बकऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच मिळलेल्या माहितूनसार या घटनेचा तपास करण्यासाठी फोरेंसिक विशेषतज्ज्ञाची एक टीम घटनास्थळी पोहचली आहे. कंपनी ने एक   मृतकांच्या कुटुंबाला 30 लाख रुपये देण्याची मदत जाहीर केली आहे.