शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (21:38 IST)

4 व 5 नोव्हेंबरला शिर्डीत राष्ट्रवादीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर

jayant patil
आगामी काळात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे बैठक पार पडली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माहिती दिली. 
 
महाराष्ट्रातील विविध भागातील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरही चर्चा झाली. शिवाय, 4 व 5 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरावरही चर्चा करण्यात आली. या शिबिराला राज्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited by : Ratnadeep Ranshoor