संबंधित माहिती
- राष्ट्रवादीच्या बैठकीला आमंत्रण नव्हतं? जयंत पाटील म्हणतात, प्रत्येकाला प्रत्येक बैठकीला बोलावण्याचा आग्रह नसावा
- शरद पवारांच्या निर्णयाने जयंत पाटील यांना आश्रू अनावर; निर्णय मागे घेण्याची केली विनंती
- शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार कऱणार-अजित पवार
- अजित पवारांंनी म्हटलं- साहेब निर्णयावर दोन-तीन दिवसांत विचार करतील, पण...
- अजित पवार की सुप्रिया सुळे? राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? पक्षाचं भवितव्य काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, जयंत पाटील म्हणाले...
तसेच शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. जोपर्यंत शरद पवार राजीनामा मागे घेत नाहीत, तोपर्यंत उपोषण करू, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात कोणतेही गट पडले नाहीत, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून दोन गट पडल्याची चर्चा आहे, याबाबत विचारल असता जयंत पाटील म्हणाले, “तुम्ही आमच्यात गट पाडू नका, आमच्यात दोन गट नाहीयेत.”
राष्ट्रवादीतील अस्थिरतेवर भाष्य करताना जयंत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देणं, हे कार्यकर्त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आज सकाळपासून मी मुंबईत नाही. मला अनेक आमदार, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्षांनी फोन करून सांगितलं की, पवारसाहेबांनी राजीनामा देणं योग्य नाही, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.”
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
