सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (08:19 IST)

धाराशिव येथील बसस्थानकातून महिलेचे पावणेदोन लाखाचे दागिने लंपास

धाराशिव : जागजी गावाला जाणा-या बसची चौकशी बसस्थानकातील कंट्रोल रूममध्ये करीत असताना एका प्रवाशी महिलेचे पावणेदोन लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरीची ही घटना १६ डिसेंबर रोजी धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात घडली. या प्रकरणी प्रवाशी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, जागजी येथील मुळ रहिवाशी व सध्या भिवंडी जि. ठाणे येथे राहणा-या सुवर्णा विष्णु देशमाने ह्या दि. १६ डिसेंबर रोजी धाराशिव येथील बसस्थानकात होत्या. त्या बसस्थानक येथे त्यांच्या जवळील पर्स खाली ठेवून कंट्रोल रुम येथे जागजी येथे जाणा-या बसची विचारपूस करत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांचे पर्स मधील सोन्याचे १५ ग्रॅम वजनाचे गंठन, अंगठी, फुले, झुमके, व चांदीची चईन, चांदीचा करंडा व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६९ हजार ५३० रूपये किंमतीचा माल चोरट्यांनी गर्र्दीचा फायदा घेवून चोरुन नेला. या प्रकरणी फिर्यादी सुवर्णा देशमाने यांनी दि.१६ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलिस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor