1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2024 (09:37 IST)

अकोल्यात रिक्षा आणि कारचा अपघातात दोघांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळ डॉ. कंबे डेंटल कॉलेज समोर जातो रिक्षा आणि दुचाकीची धडक होऊन अपघात झाला. या भीषण अपघातात एका महिलेसह एका चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. 

सदर घटना मूर्तिजापूर कारंजा मार्गावर तुरखेड फाट्याजवळ घडलाय. मिळलेल्या माहितीनुसार, खेर्डा मूर्तिजापूर कडे प्रवासी घेऊन जाणारी ऑटो रिक्षा मुर्तिजापूरकडून कारंजाकडे जात असलेल्या कारला जाऊन धडकली. या अपघातात उजावंती विश्राम जाधव(40), दिव्या अजय पवार (3) असे मयत झाले आहे. तर अपघातात ऑटो चालक amar सुरेश फुलझेले(35), विश्राम सुरेश जाधव(50), दीनानाथ रामराव पवार(12) असे जखमी झाले.
कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघातात ऑटो रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घेतली असून प्रकरणाचा तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit