शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (18:03 IST)

दोन बहिणींनी रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले

दोन आयटीआयच शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींनी धावत्या रेल्वेतून उडी मारून आपलं आयुष्य संपविण्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मनारखेड रेल्वे चौकी परिसरात या दोघी मुलींनी मुंबई- कलकत्ता रेल्वेतुन एकापाठोपाठ उडी मारली. 
 
कुमारी बेबी राजपूत वय वर्षे 19 राहणार चापा जिल्हा जांगीर छत्तीसगड आणि कुमारी पूजा गिरी वय वर्ष 19 राहणार चापा जिल्हा जांगीर, छत्तीसगड असे या मयत मुलींची नावे आहेत. या दोघी सक्ख्या मावस बहिणी आहे. या मुलींनी काही दिवसांपूर्वी कोपाची ऑनलाईन परीक्षा दिली असून त्यांचे आयटीआय मध्ये कोपाचं प्रशिक्षण सुरु होते.
 
या दोघी मुलींच्या अंगावर आयटीआयचा युनिफाँर्म असून चार दिवसांपूर्वी आम्ही आयटीआयला जातो असं सांगून घरातून बाहेर पडल्या आणि परत आल्या नाही. त्यांचा शोधाशोध घेतल्यावर ही त्या सापडल्या नाही म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली. दरम्यान त्यांनी रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले.  
 
या दोघी बहिणी छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून त्यांनी रागाच्या भरात येऊन घर सोडले आणि नंतर रेल्वेतून उडी मारून आपले आयुष्य संपविले. दोन मुलींचे मृतदेह रेल्वेच्या रुळावर आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळतातच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळतातच दोन्ही कुटुंब दुःखात बुडाले आहे. त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर उद्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 
पोलिसांना प्रवाशांनी दिलेल्या  माहितीनुसार, या दोघीनी एका पाठोपाठ रेल्वेतून उडी मारली. आत्महत्येचे कारण अद्याप माहित नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.