रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (11:45 IST)

बारावी परीक्षेचा पेपर देऊन घरी जाणार्‍या दोन विद्यार्थ्यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

बारावी परीक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी जाणारया दोन विद्यार्थ्यांचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी दुपारी घडली. सागर बबन लष्करे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) व किरण बाबासाहेब ठुबे (रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) अशी मृतांची नावे आहेत.
 
जामखेड तालुक्यातील आष्टी येथून बारावीचा पेपर देऊन पारनेर तालुक्यातील दोन विद्यार्थी दुचाकीवरून घरी परत जात होते. नगर-जामखेड रस्त्यावर एका हॉटेलसमोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली ज्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 
 
अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला असून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी दिली.