शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (08:00 IST)

दोन वर्षानंतर श्रावण मास उत्साहाने भरला,त्र्यंबकेश्वरला चार दिवसात पाच लाखा पेक्षा जास्त भाविक

Trimbakeshwar
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच रविवार ,सोमवार ,मंगळवार सुट्टी या मुळे त्र्यंबकेश्वरला चार दिवसात पाच लाखा पेक्षा जास्त भाविक, यात्रेकरू येथे येण्याची शक्यता येथे वर्तवण्यात आली आहे. दोन वर्षानंतर श्रावण मास उत्साहाने भरला आहे. यात दीड लक्ष पेक्षा जास्त भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस जातील असा ही विविध यंत्रणांचा अंदाज आहे.
 
दरम्यान ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनातर्फे व श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यंत्रणे तर्फे भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत. एस टी महामंडळा द्वारे ही भाविकांसाठी नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वरला शक्यतो भाविकांनी एसटी बसने प्रवास करावा असा सल्ला यंत्रणांनी भाविकांना दिला आहे.
 
पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे लक्ष घालून आहेत. गर्दीचा वेळी वेळी आढावा घेतला जात असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली.
 
त्रंबकेश्वर मंदिर प्रशासन दक्ष असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.सध्या दररोज तीस ते पस्तीस हजार यात्रेकरू दर्शन घेत असल्याचा ट्रस्ट मंडळाचा दावा आहे.मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून कायदा सुव्यवस्था भर देण्यात आल्याचे पोलीस अधिकारी कविता फडतरे रणदिवे यांनी सांगितले. स्वच्छता व नागरिक सुविधांसाठी नगरपालिकेने कंबर कसल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली.