शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (20:38 IST)

उदय सामंत यांची मोठी घोषणा : मुंबई महानगरपालिकेचे मागील 25 वर्षाचं ऑडिट होणार

uday samant
शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची 25 वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा ऑडिट करण्याची मागणी होत आहे. मागील 25 वर्षात  मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून कायम करण्यात येत आहे.  त्याच  पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची मागील 25  वर्षाच ऑडिट केलं जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या  मागील 25 वर्षातील अर्थिक व्यवहारांचा ऑडिट होणार आहे.  यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
 
दरम्यान नियोजन, नगरविकास विभाग यांचे सचिव समितीमध्ये सहभागी असणार आहे. भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना मागणी केली होती. पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे
 
मुंबई महानगरपालिकेत 8 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी  हा फक्त ट्रेलर असल्याचं  सांगून खरा पिक्चर बाकी असल्याचं म्हटलं  होते.  
 
भाजपाने या निवडणुकीसाठी पहिल्यापासूनच कंबर कसली होती. शिंदे गट सोबत आल्यानंतर आपलं महानगरपालिकेचं स्वप्न  सत्यात उतरेल असे भाजपला वाटत आहे. कारण अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे.
 
त्यामुळे  मुंबईत शिवसेना आणि ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून त्यापार्श्वभूमीवर हे ऑडिट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेवर  कोणाचा ध्वज झेंडा फडकणार त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

Edited by -Ratnadeep Ranshoor