गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (08:20 IST)

उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती, विजय शिवतारे यांचा गौप्यस्फोट

uddhav thackeray
महाविकास आघाडी निवडणुकीनंतर झालेली नाही. ती आगोदरच झाली होती. लोकांना फसवलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर समझोता केला होता, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात बंडाची बिजंही मीच पेरली, असा दावाही शिवतारे यांनी केला आहे.
 
शिवतारे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, महाविकास आघाडी नंतर झालेली नाही. मी यातलं आतलं राजकारण सांगतो. 70 सीट तुमच्या-आमच्या, कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं हे आधीच ठरलं होतं. निव्वळ आम्हाला लढवून उद्धव ठाकरेंनीच सीट वाया घालवल्या. महाविकास आघाडी नंतर नाही झाली, फसवतायत लोकांना अगोदरच झाली होती आघाडी.
 
त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मनात बंडाची बिजं मीच पेरली. साडेचार तास नंदनवनमध्ये बसून मी शिंदे यांना तयार केल्याचा दावाही शिवतारे यांनी केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor