1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Uddhav Thackeray thanks TikTok for donating Rs 5 crore relief to CM fund

टिकटॉककडून ५ कोटी रुपयांची मदत

टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही  या मदतीसाठी कंपनीचे आभार मानले. टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून  कोविड १९ विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. 
 
मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणिव असल्याचं ते या पत्राच्या माध्यमातून म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीसुद्धा त्यांनी या पत्राद्वारे दिली. 
पुढील लेख
महाराष्ट्र ने दोन वर्षांसाठी रेडी रेकनरचे दर 40% कमी करण्याचा विचार केला पाहिजेः देवेंद्र फडणवीस