मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 22 एप्रिल 2020 (16:20 IST)

पॉवरफूल संदेश देणारा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ

करोनाविरोधात लढणाऱ्या लढवय्यांसाठी म्हणजेच आपले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातले कर्मचारी, पोलीस, स्वच्छता विभागातले कामगार यांचे मनोधैर्य वाढवणारा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर आणला आहे. आपण लढणार आपण जिंकणार असा पॉवरफूल संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. 
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळा देश बंद आहे. महाराष्ट्रातली मुंबई, कोल्हापूर आणि इतर महत्त्वाची ठिकाणं लॉकडाउनमुळे कशी शांत झाली आहेत हे दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा येतो. त्यामध्ये दिसतात ते करोना विरोधात नेटाने लढा देणारे लढवय्ये… म्हणजेच डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस.. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा एकच फोटो येतो आणि त्याभोवती संदेश येतो आपण लढणार आपण जिंकणार!