गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

औरंगजेबासोबत माजी मुख्यमंत्री ठाकरे यांचे होर्डिंग

Uddhav Thackeray Aurangzeb Hoarding in Mumbai
Uddhav Thackeray Aurangzeb Hoarding मुंबईतील माहीम परिसरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे औरंगजेबाचे चित्र असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
 
रात्रीच्या वेळी पोस्टर्स लावण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले, ते कोणी लावले याबाबत कोणतीही माहिती नाही. तो आता काढण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवतील.
 
होर्डिंगवरून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरेंचे औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम पाहायला मिळते, असे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.