शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (09:15 IST)

भाजपने जनतेचा अपेक्षाभंग केला - उद्धव ठाकरे

uddhav thakare
देशातील जनता निराश झाली आहे. लोकांच्या मनात भाजपने अपेक्षाभंग केल्याची भावना निर्माण झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लोकांशी संवाद साधून भाजपविषयीच्या या वास्तवाची तपासणी केल्याचा दावाही उद्धव यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी उद्धव यांनी राज्य सरकारच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीविषयी असमाधान व्यक्त केले. फडणवीस सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत जनता सराकारच्या कामगिरीविषयी समाधानी असल्याचा दावा केला होता. हे सरकार काही तरी करते आहे अशी जाणीव लोकांमध्येही निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी करून सरकारला नेहमीप्रमाणे घरचा आहेर दिला आहे.