1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (10:33 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार

Under the leadership of Chief Minister Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.
 
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित होते.
 
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष - शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेचा स्पष्ट जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहोत.”
 
ते म्हणाले की, “सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव ते लवकरात लवकर देतील. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची दारं २४ तास खुली आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतत्वाखाली स्थापन होणाऱ्या या सरकारसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही मान्यता मिळाली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी मा. देवेंद्रजी फडणवीस यांची एकमताने निवड केली आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टी मा. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल.”