गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (11:08 IST)

सहा महिन्याच्या चिमुरड्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू पुण्यातील घटना

accident
पुण्याच्या राजगुरू नगर परिसरात ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुरड्याचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात राजगुरूनगर येथील वाडा रस्त्यावर झाला. आई वडील आपल्या सहा महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना दुचाकीला रस्त्यावरून जात असताना एका ट्रॅक्टर ची धडक बसली आणि आई वडील बाळासह खाली कोसळले आणि आईच्या कुशीत असलेला हा चिमुकला ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. बाळाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला.  अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळ वरून पळाला. या घटनेची चौकशी करणार असून चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.