मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2024 (22:56 IST)

नाशिकमध्ये अज्ञातांनी राज ठाकरे यांचे बॅनर्स फाडले

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठिकाठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरे यांचे लावलेले बॅनर्स फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार , राज ठाकरे उद्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. त्यानिमित्त काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले होते. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी हे बॅनर्स फाडले आहे.
 
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी राज ठाकरे नाशकात दाखल होणार आहेत. उद्या महाशिवरात्रीला नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात राज ठाकरे श्रीरामाचे दर्शन आणि आरती करणार आहेत. नाशिक शहरातील विविध शाखांचे करणार उद्घाटन तसेच भेटी देणार आहेत.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor