शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:17 IST)

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट येणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  16 ते 22 फेब्रुवारी या दिवसांत थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 
 
गेल्या काही दिवसां राज्यातील तापमानात वाढ झाली होती.. तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावलं होतं. तीन दिवसानंतर तापमानाचा पारा पुन्हा उतरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढच्या दिवसात वायव्येकडील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 3-5°C ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.