शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (14:22 IST)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणातून माघार

Senior social activist Anna Hazare withdraws from fast ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणातून माघारMarathi Regional News  In Webdunia Marathi
ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची उद्या होणाऱ्या उपोषणातून माघार घेण्यात आली आहे. त्यांनी आंदोलन करावे किंवा नाही या साठी राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये राज्य सरकार ने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्री करावी की नाही? आणि अण्णांनी या साठीच्या आंदोलनासाठीच्या उपोषणात बसावे की नाही. या बाबत ठराव मांडण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत वाईन विक्रीच्या निर्णया बाबत राज्य सरकारने पुनर्विचार करावा आणि अण्णांनी हे उपोषण करू नये. असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ग्राम सभेत सर्व ग्रामस्थांनीनी एकमुखाने आंदोलन न करण्याचा ठराव मंजूर झाल्यामुळे राज्यसरकारच्या वाईन विक्रीच्या विरोधात उद्या पासून करण्यात येणाऱ्या उपोषणातून माघार घेतल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे.