शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (15:55 IST)

तोपर्यत आघाडीला धोका नाही : उपमुख्यमंत्री

प्रत्येक पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याचा अधिकार आहे. मात्र राज्यातील सरकार स्थापनेचा निर्णय तिन्ही पक्षप्रमुखांचा. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असेपर्यंत आघाडीला धोका नाही असं उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
आघाडीतील तिन्ही पक्षांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांनी त्यांचं काम करत आहेत. ही आघाडी तीन पक्षप्रमुखांनी स्थापन केली आहे. त्यामुळे या तीन नेत्यांचा जो पर्यंत पाठिंबा आहे, तोपर्यंत ही आघाडी स्थिर आहे, असं अजित पवार म्हणाले. जे विरोधक आहेत त्यांना तीन पक्षांचं सरकार आल्याचं पोट दुखणं बंद झालेलं नाही आहे, अशी टीका देखील अजित पवार यांनी केली.
 
तीन पक्षांचं सरकार आल्याचं पोटदुखी काही बंद झालेली नाही. त्यांना इतके दिवस वाटत होतं की हे सरकार आता पडेल, उद्या पडेल, आता दिड वर्ष होत आलं. काहीच होईना. म्हणून आता आरक्षण मुद्दा, मोर्चावरुन वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर विरोधकांची दुटप्पी भूमिका असल्याची टिका अजित पवार यांनी केली