वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीडच्या न्यायालयाने वाल्मिक कराड यांना खंडणी अणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावण्यात आली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची पोलिस कोठड़ी आज संपली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता बीड न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे. कराड यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बीडच्या न्यायालयात कराड यांची व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे सुनावणी झाली. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात खंडणी व मकोका या गुन्ह्यात न्यायालयीन कोठड़ी सुनावली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणासह खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाली असल्याची माहिती सीआयडीने न्यायालया समोर सादर केली या माहितीवरून न्यायालयाने कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली. मकोका लागल्याने त्यांना जामीन मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
Edited By - Priya Dixit