शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (08:01 IST)

कोकण रेल्वे स्थानकावरुन मुंबईला निघणाऱ्याा वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द

ओडिशा येथे रेल्वे अपघातामुळे  शनिवारी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरुन मुंबईला निघणाऱ्याा वंदे भारत रेल्वे शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडळ एक्सप्रेसला ओडिशा राज्यातील बालासोरापासून ४० किलोमीटर अंतरावर एक मालगाडी धडकली. यात एक्सप्रेसचे अंदाजे १८ डबे रुळावरुन घरसले आहेत. सदया एकूण १३२ जखमींंना तेथील इस्पितळात दाखल केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव हे तातडीने तेथे रवाना झाले आहेत. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उदया शनिवारी मडगावात होणार कार्यक्रम रद्द होणार असल्याचे सांगितले. लवकरच पुढील तारीख निश्वित केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
 
वंदे भारत रेल्वे उदघाटन संभारभासाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारीही केली होती. शाळकरी मुलांना या रेल्वेतून सैर करण्याची संधीही उपल्बध करण्यात आली होती.


Edited By- Ratnadeep Ranshoor