मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (20:48 IST)

एसीबीच्या गळाला मोठा मासा; नाशिकमध्ये ५० हजारांची लाच घेताना महिला अधिकारी अटकेत

Bribe
नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्यासह एकाला 55 हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी अटक केली आहे. यामुळे महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
 
मनपा शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी सुनिता धनगर व लिपिक नितीन जोशी अशी लाच घेणार्‍यांची नावे आहेत. निलंंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजु करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती तर लिपिकाने 5 हजार रुपये लाच म्हणून मागितले होते. यापूर्वी महानगरपालिकेमध्ये सुमारे तीन महिन्यापूर्वी दोन लिपिकांना लाच घेताना अटक केली होती त्यानंतर ही एक मोठी कारवाई आहे.
 
सुनिता धनगर या शिक्षण विभागाकडून महानगरपालिकेच्या सेवेमध्ये आले असून त्यांचा महानगरपालिकेतील कार्यकाळ पूर्ण होण्याच्या मार्गावर होता. त्यापूर्वीच त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी नाशिक मध्ये सहकार उपनिबंधक सतीश खरे यांना लाच घेताना अटक केली होती त्यानंतर ही मोठी कारवाई मानली जात आहे. यामुळे महानगरपालिकेमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाई प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
 
Edited By-Ratnadeep Ranshoor