शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (07:57 IST)

वसंत मोरे ट्विट करत म्हणाले, माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून….

vasant more
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांची काल मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी पुण्य़ात भेट घेतली. नाराज असलेल्या मोरे यांची नाराजी दूर करण्य़ाचा त्य़ांनी प्रयत्न केला. यानंतर वसंत मोरे यांनी ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी असलेले नाते किती खरे आहे हे सांगण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
 
काय म्हणाले ट्विट करत वसंत मोरे
मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने मा.राजसाहेबांचे आणि माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले.आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटलं माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि…. असे कॅप्शन देत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
 
खऱ्या अर्थाने कळेल….
वसंत मोरे यांनी एक महिन्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमातील बॅनर शोधून काढला आहे. त्यात राज ठाकरे आणि वसंत मोरे हे समोरा-समोर उभे असल्याचे दिसत आहे. हा बॅनर महिनाभर चिटकून ठेवल्यामुळे तो बाजूला होताना देखील मोरेंना कसरत करावी लागली. यातूनच राज ठाकरे आणि मोरे यांचे नाते किती घनिष्ठ आहे हे सांगण्य़ाचा त्यांनी प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थाने कळेल राजसाहेबांचे आणि माझे नेते काय आहे असेही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor