शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (15:07 IST)

TET (Teacher Eligibility Test) प्रमाणपत्राची पडताळणी

शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकारानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला असून उमेदवारांनी त्यांची मूळ प्रमाणपत्रे ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. 13 फेब्रुवारी 2013 नंतर प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार असून 4 जानेवारी रोजी स्वतंत्र आदेश जारी करण्यात आला आहे.  
 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे (Maharashtra State Examination Council, Pune) आयुक्‍त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षेतील गैरव्यहार प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांनी नियुक्‍ती, पदस्थापना मिळविली, असा शालेय शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळेच 4 जानेवारी रोजी त्यासंबंधीचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षकपदी नियुक्‍त झालेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी व खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यासंबंधीचे सक्‍त आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत ते प्रमाणपत्र संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र जमा करायचे आहे. प्रत्येकांनी त्यांच्याकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.